Wednesday, October 14, 2009

चिंब भिजलेले lyrics

या रिमझिम झिलमिल पाउस धारा तनमन फुलवुन जाती [समूह]


या रिमझिम झिलमिल पाउस धारा तनमन फुलवुन जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती


हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतिचे [समूह]


चिंब भिजलेले, रूप सजलेले

बरसुनी आले रंग प्रीतीचे        (२)




कोण जागे राज सारी अंतरी सुख बोले

सप्तरंगी पाखरू हे इंद्रधनुवर आले. [समूह ]


लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी  ... ?  होते

पडसाद  भावनांचे रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत पाणी बेधुंद प्रीतिचे [ समूह ]


चिंब भिजलेले, रूप सजलेले

बरसुनी आले रंग प्रीतीचे        (२)



कोण आले पंख आले, रूप हे सुखाचे
रोम रोमी जागले दीप बघ स्वप्नांचे [समूह]


बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भरजरी वेड हे ताल चंदाचे


घन व्याकुळ रिमझिमणारा मन अंतर दरवळणारा
ही स्वर्ग सुखाची दारे हे गीत प्रीतिचे [ समूह ]


चिंब भिजलेले, रूप सजलेले

बरसुनी आले रंग प्रीतीचे        (२)

-------------------------------------------------------------------

खरं सांगायचं तर हे गाणं मला खूप आवडतं. पण त्याचे बोल ऐकून मात्र निराशा झाली.

१. झिलमिल : हिंदी शब्द
२. गंध सुखाचा हाती : हौशी कवी असल्यासारखी यमक जुळवणी
३. कोण जागे राज सारी अंतरी सुख बोले : याचा अर्थ कुणी मला समजावून सांगेल काय?
                                                     की मी ऐकण्यात काही चूक केली आहे?
४. ही मिठी लाडकी  ... ?  होते : इथे शंकर महादेवन काय शब्द म्हणतो तो मला तरी काही कळाला नाहिये.
                                         होबरा/गोबरा ?? कुणाला समजल्यास सांगावा.
                                         जमल्यास त्या शब्दाचे प्रयोजनही सांगावे.
५. भरजरी वेड हे ताल चंदाचे : पुन्हा एकदा हौशी कवी असल्यासारखी यमक जुळवणी

 या इथून तुम्ही गाणं डाउनलोड करू शकता.